कोल्हापूर महापाैरपदी सरिता मोरे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 डिसेंबर 2018

कोल्हापूर - महापालिकेच्या बहुचर्चीत महापौर निवडीत कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे यांनी बाजी मारली. तर उपमहापौरपदी आघाडीच्या भुपाल शेटे यांची निवड झाली. महापौर निवड प्रक्रियेमध्ये मोरे यांना 41 तर ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांना 33 मते मिळाली.

दरम्यान निवडीनंतर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश अखेरपर्यंत आला नाही. या निवडणूकीत शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित राहीले. 

दरम्यान, महापौर निवडीच्या प्रक्रियेसाठी महापालिकेच्या इमारतीमध्ये प्रवेश करण्यास सत्तारुढ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना ओळखपत्राची सक्ती केली. ओळखपत्र असेल तरच आत सोडण्यात येईल, असे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी सांगितल्याने आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी याला आक्षेप घेतला. यावेळी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव व श्री. मुश्रीफ यांच्यात जोरदार वादावादी झाली. पोलिसांचा येथे संबंधच काय पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची दादागिरी सुरू आहे, असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी नगरसेवकांना आत सोडण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांची जोरदार अटकाव केला. कायदा व्यवस्था राखण्याचा प्रयत्न करणार, अशी कडक भुमिका पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली. या कारणावरून दोन्ही कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पोलिस अधिकाऱ्यात बाचाबाची झाली. मुश्रीफ यांनी पोलिस उपअधीक्षक गुरव यांना तुम्हाला गडचिरोलीला पाठवू अशी धमकी दिली. गुरव यांनी गडचिरोलीला काय घरी जायला तयार आहे. वर्दीचाच मान राखणार. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणार. ओळखपत्र पाहिल्या शिवाय आत सोडणार नाही, अशी खंबीर भुमिका श्री गुरव यांनी घेतली. 

महापालिका आवारात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलिस निरिक्षक तानाजी सावंत, पोलिस निरिक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी कडेकोड बंदोबस्त ठेवला आहे. 

Web Title: Sarita More New Mayor of Kolhapur

संबंधित बातम्या

Saam TV Live