पाच मोठ्या निर्णयांमुळे योगी आदित्यनाथ चर्चेत

UP Diwas, Yogi Adityanath,Uttar Pradesh

उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शपथविधीला चोवीस तास उलटण्याच्या आत पाच नवे निर्णय घेतले आहेत. ज्यांची चर्चा आता देशभरात आहे. सगळ्या मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसात आपली संपत्ती जाहीर करावी, बेरोजगार तरूणांना रोजगार दिला जाईल, कोणत्याही मंत्र्यानं वादग्रस्त वक्तव्य करू नये, ग्रामिण भागाचा विकास करणं हे सरकारचं कर्तव्य आहे हे विसरू नका आणि श्रीकांत वर्मा तसंच सिद्धार्थ नाथ सिंह यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती असे हे पाच निर्णय आहेत.

आज योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा केली. उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुधारावी तसेच अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या सचिवांशी देखील चर्चा केली.

आजपासून योगी आदित्यनाथ यांनी आपला मुक्काम आजपासून मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या शासकीय बंगल्यात हलवला आहे.

image_print
Total Views : 352

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड