बीडमध्ये राष्ट्रवादीला ‘धक्का, 7 सदस्यांचा भाजपला पाठिंबा

Suresh dhas,Dr.Bharat Bhushan Kshirsagar ,Beed District President, NCP, Dhananjay Munde

बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.कारण राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांचे पाच सदस्य भाजपला मदत करणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक रंगतदार होणारे.  विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.. कारण सुरेश धस यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना अपयश आल्याची माहिती आहे. दरम्यान बीड जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांनाच पक्षाकडून बळ दिलं जात असल्याचा धस यांचा आरोप आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्यात धस यांचाही मोठा वाटा आहे. धनंजय मुंडे यांचं नेतृत्व सुरेश धस यांना मान्य नसल्याचं बोललं जात. त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे. तर तिकडे  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा रात्री उशीरा दिल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीने बीड पंचायत समितीमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या नावे व्हीप बजावून क्षीरसागरांना घरातूनच आव्हान निर्माण केलं होतं. याचाच राग म्हणून भारतभूषण यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जातंय.

image_print
Total Views : 299

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड