राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस

MARD, doctor protest,Mumbai, maharashtra

डॉक्टर मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईच्या सायन रुग्णालयात डॉक्टरला झालेल्या मारहाणीविरोधात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे मात्र प्रचंड हाल सुरु आहेत. हॉस्पिटलबाहेर रुग्णांच्या रांगा मोठ्या लागल्यात.

दुसरीकडे डॉक्टरांच्या सामूहिक रजेविरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणारे. निवासी डॉक्टरांचा संप बेकायदेशीर असून सामूहिक रजेवर जाऊन डॉक्टरांनी कोर्टाचा अवमान केला, असा दावा याचिकेत केला आहे.

दरम्यान निवासी डॉक्टर नियमांनुसार कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला आहे.

image_print
Total Views : 90

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड