मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आज शिक्षेबाबत युक्तीवाद होणार सुरू

Mumbai blast, 1993 blasts, Abu Salem, Mustafa Dossa,Special TADA court

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱया 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष टाडा न्यायालयानं शुक्रवारी अंडरवर्ल्डचा डॉन अबू सालेमसह सहा जणांना दोषी ठरवलं. तर एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टानं अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्लाह शेखला दोषी ठरवलंय. कोर्टानं सर्व आरोपींवर कट आणि हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवलंय. अब्दुल्ल कय्यूम याची मात्र कोर्टानं सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. आजपासून या शिक्षेबाबत युक्तीवाद सुरू होणारंय. 12 मार्च 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटात 257 जणांचा मफत्यू झाला होता; तर 713 जण जखमी झाले होते. मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या दुसऱया टप्प्यात मुस्तफा डोसा, अबू सालेम, फिरोज अब्दूल रशिद खान, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दीकी, अब्दुल कय्युम शेख आणि करीमुल्लाह यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.

image_print
Total Views : 150

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड