एटीएम कार्ड बदलून सव्वादोन लाख लंपास

एटीएम कार्ड बदलून सव्वादोन लाख लंपास

नांदेड : एटीएम कार्डची अदलाबदल करून व पीन क्रमांक (पासवर्ड) लक्षात ठेवून वेगवेगळ्या ठिकाणाहून सव्वा दोन लाख रुपये लंपास केल्याची घटना लोहा शहरात 27 डिसेंबर 2018 ते दोन जानेवारी दरम्यान घडली. लोहा शहरातील शिवाजी चौक येथील एटीएम केंद्रावर खेडकरवाडीचे गुंडेराव गोविंद खेडकर यांनी आपल्या मुलाला एटीएम कार्ड घेऊन पैसे काढण्यासाठी पाठविले. परंतु त्या मुलाला एटीएममधून पैसे काढता येत नव्हते. याचा फायदा याच एटीएम केंद्रात थांबलेल्या एका चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्ड घेतले. त्याला पासवर्ड विचारले व लक्षात ठेवले. मात्र एटीएममध्ये आपल्या जवळील त्याच बँकेचे कार्ड घातले. पैसे येत नसल्याचे सांगुन त्याने खेडकर याचे कार्ड बदलून आपल्या जवळचे कार्ड त्याला दिले. तो बनावट कार्ड घेऊन मुलगा परत गेला. त्यानंतर चोरट्याने वेगवेगळ्या एटीएममधून पाच दिवसात 2 लाख 16 हजार रुपये काढून घेतले.

मोबाईलवर संदेश आल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर एटीएम कार्ड घेऊन खेडकर हे बँकेत गेले. तिथे गेल्यानंतर हा अदलाबदलीचा खेळ समोर आला. अखेर आपली फसवणुक झाल्याची तक्रार गुंडेराव खेडकर यांनी लोहा ठाण्यात दिली. यावून अनोळखी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार कपील आगलावे हे करीत आहेत

Web Title: 2 lakhs stoles with exchanging of ATM card

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com