देवदर्शनाहून परतताना अपघातात एकाच कुटुंबातील 6 ठार

221_Apr_Accident_

कवठेमहांकाळ : आगळगाव फाटा येथे आज (शुक्रवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण झालेल्या अपघात एकाच कुटुंबातील सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. मूळचे कोल्हापूरजवळील वळीवडे गांधीनगरचे रहिवाशी असणारे हे कुटूंब पंढरपूरहून देवदर्शन करून घरी परतत असताना ‘टेम्पो ट्रॅव्हलर’ बसची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला.

मिरज – पंढरपूर रस्त्यावर आगळगाव फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथे पहाटे थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मागील बाजूने मिनी बस आदळून या एकाच कुटुंबातील सहाजण ठार झाले. सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे येथील आहेत.

विनायक मार्तंड लोंढे (वय ५०), गौरव राजू नरदे (वय ९), लखन राजू संकाजी (वय ३०), रेणुका नंदकुमार हेगडे (वय ३५), नंदकुमार जयराम हेगडे (वय ४०), आदित्य नंदकुमार हेगडे (वय १३) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटी, कोयना कॉलनी, वळीवडे गांधीनगर, कोल्हापूर येथील राहणारे आहेत.

image_print
Total Views : 291

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड