मुलींनी संरक्षणासाठी कोणाच्याही मदतीशिवाय पुढे आले पाहिजे - आदित्य ठाकरे - आदित्य ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 डिसेंबर 2018

सरुड - खेड्यातल्या मुली अत्यंत तरबेज आणि जिगरबाज असतात परंतु त्यांनी स्वसंरक्षणासाठी कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः पुढे आले पाहिजे, असे मत  युवा सेनेचे अध्यक्ष व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची आज सरुड येथील श्री शिव शाहू महाविद्यालयच्या पटांगणात व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना वाऱ्याची मोठी झुळूक आली आणि संवाद मंडप काहीसा हवेने उंच उडाला. तेव्हा श्री. ठाकरे प्रसंगावधान राखत म्हणाले काळजी करू नका ही तर माझी जादू आहे यावर सभामंडपात एकच हशा पिकला आणि उपस्थितांनी प्रचंड दाद दिली.

सरुड - खेड्यातल्या मुली अत्यंत तरबेज आणि जिगरबाज असतात परंतु त्यांनी स्वसंरक्षणासाठी कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः पुढे आले पाहिजे, असे मत  युवा सेनेचे अध्यक्ष व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची आज सरुड येथील श्री शिव शाहू महाविद्यालयच्या पटांगणात व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना वाऱ्याची मोठी झुळूक आली आणि संवाद मंडप काहीसा हवेने उंच उडाला. तेव्हा श्री. ठाकरे प्रसंगावधान राखत म्हणाले काळजी करू नका ही तर माझी जादू आहे यावर सभामंडपात एकच हशा पिकला आणि उपस्थितांनी प्रचंड दाद दिली. प्रसंगावधान साधत वक्तव्य करण्याचा ठाकरे कुटूंबियांचा हातखंडाच आहे. त्यांचा प्रत्यय आज आदित्य यांच्या कार्यक्रमात आला. 

श्री शिव शाहू महाविद्यालयच्या पटांगणात विद्यार्थिनीशी श्री ठाकरे यांचा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यातून आलेल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी सुरुवातीला मुलींना स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. आमदार सत्यजित पाटील व माजी आमदार बाबासाहेब पाटील (सरुडकर) यांनी श्री.ठाकरे यांचे स्वागत केले.

थेट विद्यार्थ्यांच्या घोळक्यात शिरून आदित्य ठाकरे संवाद साधत होते. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमास संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, धैर्यशील माने, हंबीरराव पाटील, हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Aditya Thakare comment on womans empowerment..


संबंधित बातम्या

Saam TV Live