औरंगाबाद: कर्जमाफी मिळणार कधी; शिवसेनेचा मोर्चा

rsz_shetkari_karjamafi

औरंगाबाद : कर्जमाफीची घोषणा होउन तीन महिने झाले तरी असून त्यात सुस्पष्टता नाही. किचकट अटी शर्तीतच कर्जमाफी अडकली आहे. दसऱ्यापुर्वी कर्जमाफीची पुर्तता पुर्ण झाली पाहीजे या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी (ता.11) विभागीय आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

उन्हाचा चटका असह्य होत असला तरी शिवसैनिक व शेतकरी घशाला कोरड पडेपर्यंत कर्जमाफीच्या घोषणा देत होते. मोर्चात जिल्हाभरातुन शेतकरी सहभागी झाले आहेत. सकाळी 12 वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली.

शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे अर्ज भरुन घेताना अडचणी येत आहेत. सरकारने अनेक अटी शर्तींचा कर्जमाफीला विळखा घातला आहे. तारखांवर तारखा शेतकऱ्यांना मुदत दिली जात आहे. किचकट अटींमुळे अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ताटकळत दिवसभर रांगांमध्ये थांबावे लागत आहे अशा परिस्थितीत कर्जमाफी मिळणार कधी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

image_print
Total Views : 157

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड