‘कृषी’ला आता व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा

सेंद्रीय राज्य, सिक्कीम, Indias First Organic State, Organic Farming, Organic State, Sikkim

सोलापूर: राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कृषी शिक्षणाबाबत नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने मार्गदर्शक सूचना, अटी प्रसिद्ध केल्या आहेत. या सर्व सूचना देशातील सर्व कृषी शिक्षण संस्थांसाठी लागू ठरतात. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या नियामक मंडळाच्या जून महिन्यात झालेल्या बैठकीत कृषी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केले आहे.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात कृषी शिक्षण क्षेत्रातील नऊ अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात कृषी, फलोत्पादन, कृषी अभियांत्रिकी, वनशास्त्र, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, रेशीम-किडे शास्त्र, गृह विज्ञान, सामाजिक विज्ञान, अन्न व पोषण आहार शास्त्र यांचा समावेश आहे.

शासनाने यापूर्वी कृषी अभ्यासक्रमात बदल करून जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांचा समावेश केला आहे. तसेच, अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला विद्यार्थ्याला ऐच्छिक विषय म्हणून एखादा विषय निवडण्याची संधी मिळाल्याने तो अधिक कुशल होणार आहे. “कृषी’ला व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून दर्जा देण्यामागचा उद्देश हा विद्यार्थ्यांना शेतीपूरक व्यवसाय करता यावेत असा आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधीत यामुळे वाढ होण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्याने मिळविलेली पदवी ही तज्ज्ञ व तंत्रकुशल असल्याने याचा फायदा नोकरी मिळविण्यासाठी होणार आहे.

कृषी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा मिळावा ही अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांची मागणी होती. कृषी अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी आता तंत्रकुशल म्हणून ओळखले जातील. याचा विद्यार्थ्यांना निश्‍चितच फायदा होणार आहे.
- प्रा. डॉ. सतीश करंडे, प्राचार्य, लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा

image_print
Total Views : 111

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड