अकोल्यातील सराफाच्या 100 किलोंच्या तिजोरीची चोरी

Akola, jewellery,robbery

अकोला : येथील मोठी उमरी परिसरातील गोगटे ज्वेलर्समध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी तब्बल 100 किलो वजनाची तिजोरी चोरून नेली आहे.

सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन हद्दीमध्ये हे सराफी दुकान आहे. चोरट्यांनी येथील सोन्या चांदीसह रोख रक्कमही लंपास केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरी करणाऱ्यांबाबत अद्याप काही माहिती स्पष्ट झालेली नसून, त्या अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

या चोरीच्या प्रकाराबाबत सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिव्हिल लाईन पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

image_print
Total Views : 299

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड