आंबोली आणि चिखलदरा येथे तीन पर्यटक दरीत कोसळले

Amboli, Chikaldara,tourists, kavlesad point,slip

आंबोली : दरीच्या ठिकाणी मौजमजा करताना तोल जाऊन दोन तरुण दरीत कोसळल्याची घटना आंबोली घाटात घडली आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथील एक पर्यटक तरुण दरीत पडला असून, दोन्ही ठिकाणच्या पर्यटकांचा शोध अद्याप सुरू आहे.

प्रताप राठोड (वय २१, रा. बीड), इम्रान गारदी (वय २६, रा. गडहिंग्लज – भडगाव) अशी कावळेसाद पॉईंटच्या खोल दरीत पडलेल्या दोन तरुणांची नावे आहेत.

खोल दरीत पडलेले दोन तरुण आणि अवधूत देवरकर, राजेंद्र चोरगे, ध्यानु पाटील, रमेश देसाई, श्रीधर मगधूम (सर्व रा. गडहिंग्लज) हे एकत्र मिळून कावळेसाद पॉईंटवर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटायला आले होते.

जेवताना प्रताप राठोड, इम्रान गारदी हे दोघे तरुण मध्येच उठून फोटो काढण्यासाठी दरीच्या ठिकाणी गेले होते. ते उशिरापर्यंत आले नाहीत म्हणून सहकाऱ्यांनी शोधाशोध करण्यास सुरवात केली. दरीच्या ठिकाणी मौजमजा करताना दरीत तोल जाऊन ते तरुण दरीत कोसळल्याची माहिती एका महिलेने दिली. दाट धुक्यामुळे त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने अखेर त्या सहकाऱ्यांनी आंबोली पोलिस दूरक्षेत्र गाठलं. जीवरक्षक बाबल आल्मेडा आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. रात्र झाल्यामुळे शोधकार्यात व्यत्यय आला. त्यानंतर आज (मंगळवार) सकाळपासून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

अमरावती : चिखलदरा पंचबोल दरीत पर्यटनासाठी आलेला युवक पडला. अकोला जिल्ह्यातील कारंजा रमजानपुर येथील 8 मित्र आले होते फिरायला. पाय घसरल्याने 100 फुट दरीत युवक कोसळला. शोध सुरू आहे.

image_print
Total Views : 481

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड