कणकवली तालुक्यातील दिगवळेत सव्वा कोटीचा अपहार

कणकवली तालुक्यातील दिगवळेत सव्वा कोटीचा अपहार

कणकवली - तालुक्‍यातील दिगवळे येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेला शासनाने ९८ लाख ९६ हजार ६४० रुपयांचा निधी दिला होता; तर सभासदांकडून २३ लाख ७० एवढे भागभांडवल जमा होते.

या एकूण एक कोटी २२ लाख ६६ हजार ६४० रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याची फिर्याद उपलेखा परीक्षकांनी येथील पोलिस ठाण्यात आज दिली. यात या संस्थेच्या तत्कालीन संचालकांविरोधात अपहाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दिगवळे येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक संस्थेत प्राजक्‍ता प्रकाश कदम (रा. कणकवली), सतीश लक्ष्मण कदम (रा. करंजे), तेजश्री धाकू कदम (रा. कलमठ), शुभांगी बाळकृष्ण कदम (रा. सांगवे), अमर आनंद कदम (रा. दिगवळे), विजय शंकर कदम (रा. दिगवळे), प्रशांत विठ्ठल कदम (रा. कळसुली), सुधीर नारायण कदम (रा. कळसुली), चंद्रकांत केशव सकपाळ (रा. कुंभवडे), प्रदीप सखाराम कांबळे (रा. कणकवली), सुकन्या सुमंगल कुंभवडेकर (रा. कणकवली) आणि प्रशांत मारुती शिंदे (रा. कणकवली)  हे जुलै २००८ ते मार्च २०१५ या कालावधीत संचालक होते. 

या कालावधीत शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून भीमरत्न या संस्थेला ९८ लाख ९६ हजार ६४० रुपयांचा निधी दिला होता; तर संस्थेकडे एक कोटी २२ लाख ६६ हजार रुपये एवढे भागभांडवल होते. या एकूण एक कोटी २२ लाख ६६ हजार ६४० रुपयांच्या निधीच्या विनियोगाबाबत उपलेखापरीक्षक प्रशांत बळिराम दळवी (रा. ओरोस) यांनी तपासणी केली. त्या वेळी या निधीचा योग्य प्रकारे विनियोग झाला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या निधीचा अपहार झाल्याची तक्रार उपलेखापरीक्षकांनी आज येथील पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: appropriation in Digvlet in Kankavli Taluka

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com