अशोक गेहलोत कॉंगेसचे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सचिन पायलट यांच्या खांद्यावर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

राजस्थानमध्ये काँग्रेसनं मिळवलेल्या घवघवीत यशानंतर कॉंगेसतर्फे राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची निवड झालीये. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

त्याचबरोबर तरुण नेत्याला प्राधान्य देत उपमुख्यमंत्री पद हे सचिन पायलट यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. सचिन पायलट हेच राजस्थान कॉंगेसचे प्रदेशाध्यक्ष राहतील. राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते तसंच आमदारांसोबत झालेल्या चर्चेनंतर अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. 

राजस्थान विधानसभेत 99 जागा मिळवत काँग्रेस सर्वात मोठं पक्ष ठरला, तर भाजपच्या वाट्याला 73 जागा आल्या आहेत.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live