अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; बालिकेला पुरण्याचा प्रयत्न

Rape, Minor Child, belgaum,crime

बेळगाव : शाळेजवळ खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या बालिकेला बोलावून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्‍यात उघडकीस आली आहे. सुभाष महादेव नायकर (24, वन्नूर, ता. बैलहोंगल) असे या नराधमाचे नाव आहे. हा नराधम घटनेनंतर सदर मुलीला शाळेच्या आवारातच खड्डा खणून पुरण्याच्या तयारीत होता. परंतु, मुलीला शोधणारे वडील व गावकऱ्यांमुळे तो रंगेहाथ सापडला.

अडीच वर्षाची बालिका गावातीलच कन्नड शाळेजवळ शुक्रवारी (ता. 8) सायंकाळी सहाच्या सुमारास खेळत होती. यावेळी सुभाष हा तेथे बसला होता. त्याने सदर बालिकेला जवळ बोलावून घेऊन नंतर शाळेच्या पाठीमागे नेले. या ठिकाणी तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या बालिकेचे वडील मोटार चालक आहेत. सायंकाळी चार वाजता जेव्हा ते घरी आले, तेव्हा त्यांना त्यांची आई, पत्नी व दोन मुले घरात दिसली. परंतु, मधली अडीच वर्षाची मुलगी कुठेही दिसत नव्हती. रात्रीचे सात वाजले तरी मुलगी घरी आली नाही म्हणून बॅटरी घेऊन ते गावातील काही लोकांसह शोधण्यासाठी बाहेर पडले.

बलात्कारानंतर पुरण्याचा प्रयत्न
गावात शोध घेत असताना मुलीचे वडील व गावकरी कन्नड शाळेच्या आवारात पोहोचले. शाळेच्या पाठीमागे बॅटरीच्या उजेडात पाहिले तेव्हा तेथे सुभाष हा खड्डा खणत असल्याचे आढळून आले. बाजूलाच एका मुलीचा रडण्याचा आवाजही येत होता. सुभाषने सदर बालिकेवर अत्याचार करून तिला जिवंत पुरण्याची योजना आखली होती. बालिकेला बाजूला झोपवून तो या ठिकाणी खड्डा खणत होता. याचवेळी मुलीचे व वडील व गावकऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.

संतप्त जमावाकडून मारहाण
हे कृत्य केले तेव्हा सुभाष नशेत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. घटना पाहून संतप्त बनलेल्या गावकऱ्यांनी त्याला तेथेच बेदम मारहाण केली. यानंतर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सदर मुलीला जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. सदर तरुणालाही अटक करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. नेसरगी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. सदर तरुणावर बालअत्याचार प्रतिबंधक कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच आज सकाळी श्रीराम सेनेचे कार्यकर्तेही सिव्हील परिसरात जमले होते. सदर तरुणाला आमच्या ताब्यात द्या, असे म्हणत ते संतप्त बनले होते. परंतु, पोलिसांनी त्यांना शांत केले.

….डॉक्‍टरांच्या डोळ्यात तरळले अश्रू
अत्याचारानंतर अडीच वर्षाच्या बालिकेची प्रकृती अत्यंत नाजुक बनली आहे. तिला उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल केल्यानंतर तातडीने पाच डॉक्‍टरनी तिच्यावर उपचार सुरू केले. परंतु, अत्याचारानंतर या बालिकेची स्थिती पाहून उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. सर्वजण डोळे पुसतच बाहेर पडताना दिसत होते.

 

image_print
Total Views : 380

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड