149 कोटींचा ओला कॅबचा प्रवास !

rsz_ola_bill

मुंबई- सुशील नरसिआन यांनी प्रवास करण्यासाठी ओला कॅब बुक केली. मोटारीने तिनशे मीटर अंतर पार करून घटनास्थळी पोचविले देखील. पण, या प्रवासाचे भाडे आले तब्बल 149 कोटी. याबाबतची माहिती नरसिआन यांनी ट्विटरवरून दिली आहे.

नरसिआन यांनी 1 एप्रिल रोजी प्रवास करण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. मोटारीमधून खाली उतरल्यानंतर प्रवासाचे बिल चुकते करण्यासाठी कार्डचा वापर केला. कार्डवरून 127 रुपयांची कपात झाली. परंतु, खात्यावरून 1491045368 रुपये कपात झाल्याचे दिसले. यामुळे नरसिआन यांना एक एप्रिल रोजी ‘एप्रिल फूल’चा धक्काच बसला.

कॅब कंपनीने प्रवासाच्या भाड्यापोटी 127 रुपयांची कपात केली आहे. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे 1491045368 ही रक्कम पडली. दोन तासातच ही अडचण दूर करण्यात आली, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.

NEWS SOURCE :: सकाळ

image_print
Total Views : 469

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड