गोव्यात भाजपने मरगळ झटकली

गोव्यात भाजपने मरगळ झटकली

पणजी- मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर फेब्रुवारीत आजारी पडल्यापासून सरकार व पक्ष संघटना या पातळीवर मरगळ आली होती. त्यातील पक्षाची मरगळ काल झटकली गेली. संघटनमंत्रीपदी पून्हा रूजू झालेल्या सतीश धोंड काल येताना त्यांचे स्वागत करण्यासाठी जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी, त्यांचा उत्साह पाहता लोकसभेसोबत भाजपने विधानसभेची निवडणूक घेतली तरी यश आवाक्‍यात येईल असा विश्‍वास देणारे वातावरण तयार होत असल्याचे दिसले.

भाजपच्या येथील मुख्यालयात भाजपचे पदाधिकारी, विविध मोर्चांचे अध्यक्ष व गाभा समिती यांची एकत्रित बैठक प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी घेतली. या बैठकीत येत्या फेब्रुवारीपर्यंत मतदारसंघ व मंडळ निहाय आयोजित करावयाच्या विविध कार्यक्रमांची आखणी याबाबत या बैठकीत माहिती देण्यात आली. संघटनमंत्री विजय पुराणिक व प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर हेच या बैठकीत अनेक गोष्टी सांगत होते. यापूर्वी बैठकीत जाब विचारणारे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी याबैठकीत हे मार्गदर्शन शांतपणे ऐकण्यास प्राधान्य दिले होते.

भाजपचे संघटनमंत्री म्हणून सतीश धोंड येणार हे जाहीर झाल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी दोनशे कार्यकर्ते जमले होते. त्यांनी हारतुरे आणले होते. धोंड यांचे स्वागत असे त्यांचे छायाचित्र असलेला फलक त्यांनी आणला होता. पावाहतूक कोंडीमुळे त्यांचे वाहन कार्यालयाच्या थोडे अलीकडे थांबवावे लागले. तेथून चालत ते निघाले तेव्हा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अनेकजण त्यांना हार घालण्यासाठी झेपावले, कित्येकांना त्यांच्याशी हस्तांदोलन करायचे होते. मात्र त्यांनी हार स्वीकारले नाहीत. एका कार्यकर्त्याने बळजबरी त्यांच्या गळ्यात हार घातला खरा मात्र दुसऱ्याच क्षणाला त्यांनी तो बाहेर काढला. भाजपचे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर आहे. तळमजल्यावर इमारतीच्या आवारात असलेल्या देवस्थानात नमस्कार करून धोंड कार्यालयात गेले. तेथे काही नेत्यांनीही मोठाले हार त्यांच्या स्वागतासाठी आणले होते. कार्यालयातील बैठक कक्षात धोंड दाखल होताच हार घालून त्यांचे स्वागत करण्यात येणार होते मात्र त्यांनी तसे स्वागत स्वीकारणे नाकारले. मी काही मोठा नेता आहे की काय अशी विचारणाही त्यांनी हसत हसत केली. त्यानंतर आग्रहामुळे बंद दाराआड सुमारे दीडशे कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. 

संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. मी मार्गदर्शन ऐकून घेतले आहे. माझे काम जसे सुरु आहे तसे सुरु असेल. मतभेद मिटले वैगेरे गोष्टींवर बोलण्याची ही वेळ नव्हे. -लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री 

Web Title: BJP Agreesive Mood In Goa

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com