बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची अखेर सुटका

 बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची अखेर सुटका

मंचर : आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथे बुधवार दुपारपासून बोअरवेलमध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याला आज (गुरुवारी) सकाळी अखेर पंधरा तासांनंतर सुखरुप सुटका करण्यात आली. त्याचा शरीराचा निम्मा भाग पूर्णपणे मोकळा केल्यानंतर शरीराचा खालील भाग बोअरवेलमध्ये असलेल्या चिकट माती व पोत्यामध्ये अडकला होता, अखेर एनडीआरएफच्या जवानांनी त्याची सुखरुप बाहेर काढले.सुटका होईपर्यंत रवीशी संवाद सुरू होता. त्याला त्याचे वडील पंडित सतत धीर देत होते, मला बाहेर काढा असा आक्रोश सतत रवी करत होता हे दृश्य पाहून उपस्थितांची मने हेलावली. पोलिस, जवान तसेच काही ग्रामस्थ रात्रभर मदत कार्यात सक्रिय सहभागी झाले होते. लवकरच रवीला बाहेर काढण्यात यश येईल, असे एनडीआरएफचे जवानाकडून सांगितले जात होते. अखेर त्याला बाहेर काढण्यात आले आहे.

रवी पंडित भिल हा सहा वर्षांचा चिमुकला गेल्या पंधरा तासांपासून बोअरवेलमध्ये अडकला होता.  एनडीआरएफचे जवान शर्तीचे प्रयत्न करत होते. चिकट माती व पोत्यामध्ये त्याचा शहराचा खालील भाग अडकलेला आहे .तसेच एक पाय मुडपलेला आहे. एनडीआरएफच्या जवानांनी त्याला हाताने ओढून काढण्याचा प्रयत्न केला. पण पाय अडकला असल्यामुळे त्याला बाहेर काढता आले नाही. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी शासकीय यंत्रणा व एनडीआरएफचे जवान काम करत होते. त्याला नुकतेच ग्लुकोजचेपाणी पिण्यासाठी दिले होते. तो व्यवस्थित बोलत असून त्याच्या प्रकृतीला कसलाही धोका नसल्याचे सांगण्यात आले होते. डॉक्टरांचे पथक घटनास्थळी होते. जवळपास दहा फूट खोल समांतर खड्डा करून त्याला वाचविण्यात आले. दरम्यान या चिमुकल्याची लवकर सुटका व्हावी म्हणून परिसरातील नागरिकांनी प्रार्थना केल्या. त्याचे वडील त्या चिमुकल्याला सतत धीर देत होते. पण हा चिमुकला प्रचंड घाबरलेला आहे व थकलेला होता.

बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास खेळत असताना हा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला. त्यांच्यासमवेत असलेल्या इतर दोन-तीन लहान यांनी हा प्रकार पाहिला पाहिला. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे त्याचे कुटुंबीय पळत मदतीसाठी आले. त्यांनी जमेल तसा समांतर खड्डा घेण्यास सुरुवात केला. ही माहिती परिसरात समजल्यानंतर ग्रामस्थांनीही तेथे धाव घेतली. तहसीलदार सुषमा, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णा खराडे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर व उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे हे अधिकारी तातडीने घटनास्थळी आले. दरम्यानच्या काळात त्यांनी एनडीआरएफचे जवानांना माहिती कळवली होती. हे जवान बुधवारी रात्री आठच्या सुमारास घटनास्थळी आले. त्यानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरु झाले.

Web Title: boy rescued stuck in a borewell near Manchar Pune

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com