ब्रिटनच्या संसदेत ‘ब्रेक्‍झिट’ विधेयक मंजूर

Brexit,Theresa May,British Parliament,London

लंडन : ब्रिटनच्या संसदेत आज ‘ब्रेक्‍झिट विधेयक’ मंजूर झाले असून, यामुळे पंतप्रधान थेरेसा मे यांची युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठीची अधिकृत चर्चा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बदलाची कोणतीही शिफारस मान्य न करता हे विधेयक 274 विरुद्ध 118 मतांनी मंजूर करण्यात आले. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

युरोपीय महासंघाच्या लिस्बन करारातील 50 व्या कलमानुसार, थेरेसा मे या आता कोणत्याही क्षणी महासंघातून बाहेर पडण्याबाबत चर्चा करून प्रक्रिया सुरू करू शकतात. मात्र, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या महिनाअखेरीपर्यंत त्या चर्चा सुरू करणार नाहीत.

image_print
Total Views : 246

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड