पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल : जेटली

पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल : जेटली

नवी दिल्ली : पुलवामा येथील अवंतीपोरा भागात काल (ता. 14)  झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय सल्लागार समिती, तिन्ही सेनाप्रमुख, गृहमंत्रालय, संरक्षणमंत्रालय व परराष्ट्र मंत्रालयाची बैठक आज (ता. 15) पार पडली. यात राष्ट्रीय सल्लागार समितीचे प्रमुख अजित डोवाल, तिन्ही सेनादल प्रमुख गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री निर्मला सितारामन उपस्थित होत्या. 

उरी या लष्कराच्या महत्त्वाच्या तळावर हल्ला झाला होत, या हल्ल्यानंतर जवानांवर झालेला कालचा हल्ला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी व पुढील पाऊले उचलण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात 55 मिनिटांची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णय केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी माध्यमांसमोर मांडले.

'पुलवामामध्ये जवानांनवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आवश्यक ती पावले उचलली जातील. भारत राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर बहिष्कार टाकणार आहे, या हल्ल्याला मदत करणारा एकही गुन्हेगार वाचणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवला जाईल. तसेच पाकिस्तानचा 'मोस्ट फेवर्ड' देश हा दर्जा काढून घेतला जाईल' अशी माहिती जेटली यांनी दिली. त्याचबरोबर हुतात्मा जवानांच्या मागे संपूर्ण देश आहे असा भावनिक दिलासा जेटली यांनी दिला. या बैठकीत हुतात्मा जवानांना श्रद्धांजली दिल्याची माहिती जेटली यांनी दिली. गृहमंत्री राजनाथ सिंह काश्मिरला जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतील व पुढचे निर्णय घेतले जातील असे जेटली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. हुतात्मा जवानांचे पार्थिव त्यांच्या कुटूंबियांकडे सोपविण्याची जबाबजारी सैन्यदलाने घेतली असल्याची माहिती जेटली यांनी दिली.   

काल संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास पुलवामामधील अवंतीपोरा भागात सीआरपीएफच्या जनावांच्या ताफ्याची वाहतून सुरू असतानाच एका चारचाकी गाडीने जवानांच्या एका बसला धडक दिली व प्रचंड मोठा स्फोट झाला. यात सीआरपीएफचे 37 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याची जबाबदारी 'जैशे मोहोम्मद' या दहशतवादी संघटनेने घेतली असून, हल्ला करणारा दहशतवादी आदिल याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  

Web Title: Central Minister Arun Jaitley speaks about Pulwama terror attack

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com