चंद्रशेखर राव सलग दुसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

हैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज (ता.13) गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यानंतर, चंद्रशेखर राव हेच पुन्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार चंद्रशेखर राव यांनी स्वतंत्र तेलंगणाचे सलग दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

तेलंगणाचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिम्हन यांनी राव यांना गोपनियतेची शपथ दिली. तर मोहम्मद अली यांनाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. बुधवारी तेलगंणातील नवनिर्वाचित आमदारांनी केसीआर यांना आपला गटनेता म्हणून एकमताने निवडले होते. त्यानंतर, आज हा शपथविधी सोहळा पार पडला. केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाने राज्यातील 119 जागांपैकी तब्बल 88 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

चंद्रशेखर राव यांना मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये अनेक कामे पूर्ण करावी लागतील. तीच त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला या निवडणुकीत 46.38 टक्के मते मिळाली. गेल्या निवडणुकांत हे प्रमाण 34.04 टक्के होते. काँग्रेस, टीडीपी, सीपीआय, टीजीएस यांनी मिळून गेल्या वेळी वेगळे लढूनही एकत्रितपणे 40.48 टक्के मते मिळवली होती. यंदा एकत्र लढूनही या पक्षांची मते 8 टक्क्यांनी घसरून 32.69 टक्क्यांवर आली. म्हणजेच तिथे जी महाआघाडी झाली होती, ती प्रभाव पाडू शकली नाही आणि चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने घवघवीत यश मिळवले आणि चंद्रशेखर राव दुसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री झाले.

Web Title: Chandrasekhar Rao took oath as chief minister

संबंधित बातम्या

Saam TV Live