भुजबळांच्या कार्यक्रमात कबुतराने उडवली धमाल

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 डिसेंबर 2018

ठाणे : कबुतर जा जा जा ..असे प्रेमपूर्वक आर्जव करणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीची आठवण करून देणारा प्रसंग रविवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये रसिकांनी अनुभवला. गडकरी रंगायतनच्या सभागृहात घुसखोरी केलेल्या एका गोंडस कबुतरामुळे माळी समाजाच्या कार्यक्रमात चांगलीच धमाल उडाली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरच या कबुतराने ठिय्या मारल्याने भुजबळांनीही चक्क हात जोडले आणि भाषणादरम्यान कबुतराचा खास उल्लेख करून, या कबुतराने तुमच्यासाठी चांगला संदेश आणल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला.  

अखिल भारतीय माळी महासघांच्यावतीने माळी समाजबांधवांचे राज्यस्तरीय महासंमेलन रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमात रंगायतनच्या सभागृहात भरकटलेल्या एका कबुतराने चांगलीच रंगत आणली. संपूर्ण कार्यक्रम सुरु असताना हे कबुतर रंगायतनच्या सभागृहात घिरट्या मारून मुक्त संचार करीत होते. एका क्षणी तर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर थेट भुजबळांसमोरच या कबुतराने ठिय्या मांडला. भुजबळांनीही हात जोडून कबुतराला प्रणाम करताच छायाचित्रकारांनी क्लिकक्लिकाट केला. काही वेळानंतर कबुतरानेही ठिय्या आंदोलन सोडून मुक्त संचार सुरू केला. या कबुतराला पाहून छगन भुजबळांसह सर्वच उपस्थित आश्यर्यचकित झाले. अन, भाषणादरम्यान भुजबळांनी, हा कबुतर संदेश घेऊन येत असल्याचा उल्लेख करताच सभागृहात एकच हशा पिकला.

Web Title: Chhagan Bhujbal s Program gets disturb by pigeon

संबंधित बातम्या

Saam TV Live