परभणीत कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष

Congress,PM Narendra Modi,Politics,New Delhi,Demonetization

परभणी महापालिकेत कॉंग्रेसनं सर्वाधिक 31 जागावर विजय मिळवत कॉग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस 18 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजप आठ जागावर विजयी झालीय, तर सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला केवळ सहा जागेवरच समाधान मानावे लागले. दोन जागा अपक्षाच्या पदरात पडल्या आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉग्रेस समोर आला असला तरी त्यांना सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षाची साथ घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसला 18 जागा मिळाल्यानं सत्तेची चावी राष्ट्रवादी कॉग्रेसकडे राहू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय.

प्रभाग 15 मधून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणाऱ्या महापौर संगीता वडकर आणि प्रभाग नऊ मधून शिवसेनेकडून निवडणूक लढविणाऱ्या विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर हेही पराभूत झालेत.

image_print
Total Views : 312

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड