महानगरपालिका अधिकाऱ्यांनी चोरले ५ किलो सफरचंद

rsz_apple

विरार वसई महानगरपालिकेच्या संजय हीनवार या अधिकाऱ्यांवर सफरचंद चोरल्याचा आरोप केला आहे. संजय हीनवार यांच्यावर फळ विक्रेत्यांनी ५ किलो सफाचंद चोरल्याचा आरोप करून त्यांच्या विरुद्ध विरार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे. रामनवमीच्या दिवशी विरार पश्चिम स्वरस्वती बाग या परिसरात संजय हीनवार हे काही ठेकेदारांसह बिभीचंद रामनारायण गुप्ता या फळविक्रेत्याकडून स्वच्छता कराच्या नावाने पावती फाडू लागले आणि त्याने पावती नंतर फाडतो असे सांगितल्यास रागाने त्याचा हातगाडी वरून जवळ ५ किलो सफरचंद उचलून घेऊन गेले. हा सर्व प्रकारात संजय यांच्यासोबत चंदू व पप्पू हे देखिल होते असे फळ विक्रेत्याने सांगितले आहे. या झाल्या प्रकारची तक्रार फळ विक्रेता गुप्ता यांनी विरार पोलिसांना दिली आहे.

image_print
Total Views : 302

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड