विदर्भातील गणेश भक्तांकरिता सुवर्ण मंदिराचा देखावा

vlcsnap-2017-09-03-13h26m24s170

गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत अमरावती येथील श्री गणेशोत्सव मंडळाने यावर्षी विदर्भातील गणेश भक्तांकरिता अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिराचा देखावा साकारलाय. हा देखावा पाहण्याकरता अमरावतीकर नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. या देखाव्यात अमृतसर येथील मंदिर परिसरात असलेलं सरोवर सुद्धा इथं तयार करण्यात आलं असून गुरु ग्रंथसाहिबांची प्रतिष्ठापना या मंडळात करण्यात आली आहे. मंडळाच्यावतीने अमृतसर प्रमाणेच मंदिरात असलेला प्रसाद, स्वच्छता, चप्पल व्यवस्था आणि पाणी व्यवस्था या सर्व सेवा या मंडळाच्या कार्यकर्त्यांमार्फत देण्यात येत असून अमरावतीसह संपूर्ण विदर्भातून भाविक या सुवर्ण मंदिरात दर्शनाकरिता येत आहेत.

image_print
Total Views : 445

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड