धुळ्यात भाजपची एकहाती सत्ता, आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाचा धुव्वा

धुळ्यात भाजपची एकहाती सत्ता, आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाचा धुव्वा

धुळे महापालिकांचे जवळपास सर्वच जागांचे कल साम टीव्हीच्या हाती आले आहेत. अनिल गोटेंच्या बंडखोरीनंतर धुळ्यात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेरीस भाजपने गोटेंचा संघर्ष मोडीत काढत बहुमत मिळवलंय. तब्बल 50 जागांवर भाजपचे उमेदवार जिंकलेत. तर गोटेंच्या लोकसंग्रामला मात्र अपेक्षित यश मिळालेलं नाही. अवघ्या 3 जागांवर गोटेंचे उमेदवार विजयी झालेत. 

महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी निवडणूक पार पडली.  यात समाजवादी पक्षाच्या बिनविरोध एका महिला उमेदवारासह 355 उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी पार पडलेल्या मतदानात सरासरी 59.64 टक्के मतदान झालं. भाजपचे 62, शिवसेनेचे 50, कॉंग्रेसचे 21, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 53, लोकसंग्राम पक्षाचे 59, MIMचे 12, रासप चे 12, समाजवादी पक्षाचे 12, मनसेचा एक उमेदवार आणि इतर अपक्ष रिंगणात होते. 

WebTitle : Dhule municipal corporation election result bjp gets clear majority     

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com