ज्ञानेश्वर माउलींची पालखी फलटणहून बरडकडे मार्गस्थ

Dnyaneshwar-Maharaj-palkhi-17-06-2017

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी आज सकाळी फलटणहून बरडकडे मार्गस्थ झाली. सकाळी राजाभाऊ चोपदार यांनी प्रथेप्रमाणे दिंड्यांची हजेरी घेतली. त्यानंतर माउलींचे अश्व निघाले. पाठोपाठ माउलींची पालखी रथामध्ये ठेवण्यात आली. हरिनामाच्या गजरात लाखो वारकऱ्यांनी पंढरपूरच्या दिशेने आपला पुढचा प्रवास सुरू केला. माउलींच्या पालखीचा सकाळचा विसावा विडणी इथे आहे. तर दुपारचा विसावा निंबळक फाटा इथे आहे. त्यानंतर रात्री बरडमध्ये माउलींच्या पालखीचा मुक्काम असेल.

image_print
Total Views : 697

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड