गोदा पात्रांमध्ये गणपती विसर्जित न करता नाशिककरांकडून बाप्पांचं पर्यावरणपूरक विसर्जन

rsz_1nashik_visarjan_5sept17

नाशिक : गेल्या बारा दिवसांपासून घराघरामध्ये विराजमान असलेल्या बाप्पाचे आज तितक्याच भक्तीभावात विसर्जन करण्यात आले. यावेळी नाशिककरांनी गोदा पात्रांमध्ये गणपती विसर्जित न करता मूर्ती दान करत पर्यावरणपूरक विसर्जनाचा वसा जोपासला. विसर्जनाच्या ठिकाणी विविध संस्था उपस्थित होत्या. या संस्थांच्या स्वयंसेवकांनी देखील आलेल्या भाविकांना मूर्तीदान करत निर्माल्य कलशात टाकण्याचे आव्हान केले.

यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आलेल्या भाविकांना मूर्तीदान करण्याचे आव्हान केले. भाविकांनी आवेश बाप्पाची आरती करत विसर्जनस्थळी उपलब्ध असलेल्या कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन केले. यानंतर बाप्पांची मूर्ती उपस्थित संस्थांना सुपूर्त केली.

गंगापूर रोडवरील चोपडा लॉन परिसरात वेगवेगळ्या सामाजिक संस्था उपस्थित राहून मूर्ती दानाचे आव्हान करत होत्या. ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे संस्थापक अध्यक्ष अजय बोरस्ते यांच्यासह स्वयंसेवकांनी उपस्थित राहून आलेल्या भाविकांना मूर्ती दानाचे आवाहन केले. तसेच केटीएचएम महाविद्यालयाचे एनएसएस विभागातर्फे देखील या ठिकाणी भाविकांना आवाहन करण्यात येत होते. महापालिका प्रशासनातर्फे कृत्रिम कुंड उपलब्ध करून दिला होता. या ठिकाणी विद्यार्थी कृती समितीच्या मार्फत ‘देव द्या देवपण घ्या’ हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थापक अध्यक्ष आकाश पगार हे आपल्या स्वयंसेवकांसह उपस्थित होते.

रामकुंड परिसर यासह म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण येथे देखील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांतर्फे मूर्ती दानाचे आवाहन करण्यात आले. या वेळी प्रथमच महापालिकेतर्फे नागरिकांना अमोनियम कार्बाईड पावडर उपलब्ध करून दिले होते. त्याचा वापर करत अनेकांनी घरीच मूर्तीचे विसर्जन केल. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील नाशिककरांनी पर्यावरणपुरक विसर्जनाची परंपरा जोपासली. सकाळी सातपासूनच वेगवेगळ्या विसर्जनस्थळी सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक उपस्थित होते. सोमेश्वर, नवश्या गणपती, घारपुरे घाट यासह रामकुंड, तपोवन यांसह वेगळ्या विसर्जन ठिकाणी स्वयंसेवक उपस्थित राहून आलेल्या भाविकांना मूर्ती दान करण्याचे आवाहन करत होते.

image_print
Total Views : 348

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड