३ दशकानंतरही सरकारच्या आतड्याला पिळ पडेना!

Yavatmal,farmer, farmer suicide, sahebrao karpe

यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण इथल्या साहेबराव करपे यांच्या स्मृतीत काल राज्यभरात अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं.. यवतमाळ, ओरंगाबाग, सांगली, वर्धा, पुणे, जिल्ह्यासह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं. राजकीय ,सहकार शेती ,प्रशासन ,उद्योक व्यापार आणि सर्व क्षेत्रातील संवेदनशिल माणसांनी सकाळ पासुनच अन्नत्याग मंडपात आपली हजेरी लावली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.. यावेळी शेतकरी नेतेदेखील उपस्थित होते.. आजपासून ३१ वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्याच सत्र सुरु झाल ते आजपर्यंत कायम आहे. साहेबराव करपे यांनी नापिकीमुळे कुटुंबासह आत्महत्या केली होती. साहेबराव यांच्या स्मृतीत आज शेतकर्यांनी अन्नत्याग आंदोलन केल. क्रांतीचौक भागात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अन्नत्याग आंदोलन केल. शेतकरी आत्महत्या वाढत असून सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहावं आणि बँकांना देखील सावकारी कायदा लागू करा अशा मागण्या यावेळी शेतकर्यांनी केल्या.

image_print
Total Views : 211

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड