गजानन महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ

-महाराजांचा-पालखी-सोहळा-पंढरपूरकडे-मार्गस्थ

शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराजांचा पालखी सोहळाही भाविकांचं लक्ष वेधून घेतोय. सगळ्या पालख्यांमध्ये सर्वाधिक अंतर चालणारी पालखी असा गजानन महाराजांच्या पालखीचा लौकीक आहे. सोलापुरातला दोन दिवसांचा मुक्काम आटोपून गजानन महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गण गण गणात बोते आणि हरिनामाच्या गजरात वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेयत. पंढरपूर आता अगदी जवळ आल्यानं वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. आपल्या लाडक्या विठूमाउलीचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी आता आसुसलाय.

image_print
Total Views : 852

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड