भंडा-यात १७ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Rape, Crime against women, Delhi, Murder, बलात्कार, महिले विरुध्द गुन्हा, दिल्ली, खून

भंडारा जिल्ह्यात एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला असून याप्रकरणी पोलिसांनी ६ नराधमांना अटक केलीये. याप्रकरणातला एक आरोपी अजूनही फरार आहे. पीडित मुलीनं नोंदवलेल्या जबाबानुसार या मुलीचं आईसोबत भांडण झालं. त्यानंतर तिनं प्रियकर राकेश भिवगडेशी संपर्क साधला. त्याच्यासोबत ती पांढराबोडी परिसरात गेली. त्या ठिकाणी तिच्या प्रियकरानं तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरीक संबंध प्रस्थापित केले.. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं आपल्या सहा मित्रांना बोलावलं. या सगळ्यांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. तिला या सगळ्या नराधमांनी दाभा गावाजवळ शेतशिवारात सोडून दिलं… आणि हे सगळे आरोपी पसार झाले. बेशुद्ध अवस्थेत मुलीला सोडून हे आरोपी पसार झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी या मुलीला रूग्णालयात दाखल केलं. तसंच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ज्यानंतर या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पीडित मुलगी शुद्धीवर येताच तिनं आपल्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. ज्यानंतर पोलिसांनी ६ नराधमांना अटक केली आहे. धम्मा नागदेवे हा आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.

image_print
Total Views : 337

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड