वाकुल्या दाखवणारी मुलगी सोशल मीडियावर व्हायरल

वाकुल्या दाखवणारी मुलगी सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली - आपण एखादा फोटो काढत असताना किंवा व्हिडिओ काढत असताना एखादी अनोळखी व्यक्ती त्यामध्ये टिपली गेली असे अनेकदा झाले असेल. बऱ्याचदा सेलेब्रिटिंचे फोटो किंवा व्हिडिओ काढत असताना अनेक जण आपणही कॅमेरात टिपले जावे म्हणून फोटोत किंवा व्हिडिओमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. परंतु, हा व्हिडिओ कोणत्या सेलेब्रिटीचा नसून, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांचा आहे. यामध्ये त्यांच्यामागे एक मुलगी वाकुल्या दाखवताना दिसत आहे.  

शुक्रवारी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हंगामी अर्थसंकल्प पियूष गोयल यांनी सादर केला. शेतकरी, मध्यमवर्ग आणि कामगार वर्गासाठी या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस होता. त्यामुळे याची चांगलिच चर्चा सोशल मिडियावर होती. यातच हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर संसदेबाहेर जयंत सिन्हा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत होते. त्यांनी मोदी सरकारचं अभिनंदन करत विरोधकांवर टीका केली. यावेळी त्यांच्या मागे एक मुलगी वावरत होती. सुरुवातीला शांत उभ्या असणाऱ्या या मुलीने अचानक कॅमेऱ्याकडे पाहून वाकुल्या दाखवण्यास सुरुवात केली. महत्त्वाचं म्हणजे जयंत सिन्हा किंवा आजुबाजूला असणाऱ्या कोणालाही याची कल्पनाही आली नाही. 

दरम्यान, इतक्या बिनधास्तपणे वाकुल्या दाखवणारी मुलगी कोण याबद्दल आता सोशल मिडियावर चांगलीच उत्सुकता आहे. 

Web Title: girl photobombs jayant sinha after budget speech viral on social media

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com