ऑस्ट्रेलिया, इराणला यंदा हापूसची वारी

Australia, Iran , indian aplhonso, america, Europe, Dubai, Export

मुंबई – अमेरिका, युरोप, दुबईपाठोपाठ आता ऑस्ट्रेलिया, इराण आणि दक्षिण कोरियाची बाजारपेठ हापूस आंब्याला खुली झाली आहे. कोकणातील हापूस आंब्याची पाच एप्रिलपासून प्रथमच या देशांमध्ये निर्यात होणार आहे.

“अपेडा’ व कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून तीन वर्षांपासून निर्यात होण्यासाठी प्रयत्न केले जात होते. अखेर यंदा यश आले असून, निर्यातीला हिरवा कंदील मिळाल्यामुळे ऑस्ट्रेलिया, इराण आणि दक्षिण कोरियात आंब्याचा सुगंध दरवळणार आहे. यापूर्वी भारतातून आखाती देशांसह युरोप व अमेरिकेत आंब्याची निर्यात केली जात असे. मात्र, ऑस्ट्रेलिया, इराण आणि दक्षिण कोरियामध्ये आंब्याची निर्यात करण्यात आली नव्हती.

या देशाच्या प्रतिनिधींनी नवी मुंबईतील वाशी येथील “वी किरण’ सुविधा केंद्राला तीन वेळा भेट दिली. तसेच आंब्यावर होणाऱ्या प्रक्रियेबाबत खात्री पटवून घेतली. त्यानंतर त्यांनी आंब्याला आपल्या देशामध्ये येण्यास हिरवा कंदील दाखविला. आंबा पाठविताना प्रक्रिया करण्याची आवश्‍यकता आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलियाला आंबा पाठवताना “वी किरण’ प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच आंब्यावर गामा किरणांचा मारा करून त्यातील कीड मारली जाणार आहे, तर इराण व दक्षिण कोरियाला निर्यातीसाठी आंब्यावर “हॉट वॉटर ट्रीटमेंट’ केली जाणार आहे. वाशीतील सुविधा केंद्रात या सुविधा उपलब्ध आहेत.

image_print
Total Views : 205

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड