ममता बॅनर्जी कोणाला पाठिशी घालत आहेत: राजनाथसिंह

ममता बॅनर्जी कोणाला पाठिशी घालत आहेत: राजनाथसिंह

नवी दिल्ली : शारदा चीटफंड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) काम करत आहे. कोलकता पोलिस आयुक्तांना अनेकवेळा चौकशीसाठी समन्स देऊनही ते आलेले नाहीत. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅऩर्जी कोणाला पाठिशी घालत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.

राजनाथसिंह म्हणाले, की शारदा चीटफंड गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने घेतले आहेत. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिस आयुक्तांना अनेकवेळा समन्स पाठविले. पण, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. ममता बॅऩर्जी कोणाला पाठिशी घालत आहेत, हे त्यांनी जाहीर करावे. पोलिसांनी तपासात सहकार्य करावे, सीबीआयआला इतिहासात पहिल्यांदाच रोखण्यात आले. सीबीआयला रोखणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या गैरव्यवहारात आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचे समोर आलेले आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस विरुद्ध भाजप या राजकीय संघर्षाला चांगलीच धार आली आहे. चिट फंड गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकार्‍यांना पश्चिम बंगालच्या पोलिसांनीच विरोध केला आहे. ममता बॅऩर्जी यांनी धरणे आंदोलन सुरु केले असून, आजही आंदोलन सुरुच आहे. या घटनेचे राजकीय पडसादही तातडीने उमटले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधून 'राजकीय संघर्षात तुमच्याबरोबर आहोत' अशी ग्वाही दिली आहे.

Web Title: Home minister Rajnath Singh speaks on West Bengal issue in LokSabha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com