“मी सिद्ध ‘राम’ आहे आणि शंभर टक्के हिंदू”

siddaramaiah,Mysuru, Karnataka CM, Hindu, Hindu politics

म्हैसूर : माझे नाव काय आहे ? ते आहे सिद्धराम. होय, मी सिद्धराम आहे आणि शंभर टक्के हिंदू आहे. हिंदू असल्याबद्दल मला अभिमान आहे.पण, राजकारणासाठी हिंदुत्त्वाचे राजकारण मी कदापी करणार नाही. भाजप हिंदुत्त्वाचा अजेंडा राज्यात राबवून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करीत आहे अशी टीका कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे केला.

दक्षिण कर्नाटकात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. याकडे लक्ष वेधन रामय्या यांनी कर्नाटकालाही उत्तरप्रदेशच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न येथील भाजपची मंडळी करीत आहे असा आरोपही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.

ते म्हणाले, की मी राज्याचा मुख्यमंत्री आहे. हो मी हिंदू आहे. माझ्या नावातच सर्वकाही आहे. निवडणूक काळात मतांच्या धृवीकरणाचा प्रयत्न सातत्याने भाजप करीत असतो. मी हिंदू आहे पण, भाजपला ज्याप्रमाणे वाटते त्याप्रमाणे नाही. उत्तरप्रदेशात हिंदुंचे राजकारण करून सत्ता मिळविली. तेथे मतांचे धृवीकरण करण्यात आले. केंद्रातील भाजप नेते कर्नाटकात येऊन जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालत आहे. पण, त्यांचा हा प्रयत्न आपण हाणून पाडू.

image_print
Total Views : 172

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड