महाबळेश्‍वरमध्ये हिमकणांची पांढरीशुभ्र चादर

शुक्रवार, 23 मार्च 2018

महाबळेश्‍वर - राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढू लागली असतानाच महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये मात्र सध्या अतिशय आल्हाददायक वातावरण अनुभवायास येत आहे. येथील वेण्णालेक ते लिंगमळा परिसरात आज (शुक्रवार) पहाटे दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरीशुभ्र चादर ठिकठिकाणी शेती व स्ट्रॉबेरी मळ्यामध्ये पाहावयास मिळाली. या परिसरात 4-5 डिग्रीपर्यंत पारा खाली उतरला होता. या निसर्गाच्या अविष्काराचा आनंद स्थानिकांसह पर्यटकांनी लुटला. हिवाळा हंगामात अशा प्रकारे हिमकण पाहावयास मिळत असतात. मात्र उन्हाळी हंगामाच्या सुरवातीलाच अशाप्रकारे हिमकण दिसणे हे येथील दुर्मिळ चित्रच म्हणावे लागेल.

महाबळेश्‍वर - राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढू लागली असतानाच महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये मात्र सध्या अतिशय आल्हाददायक वातावरण अनुभवायास येत आहे. येथील वेण्णालेक ते लिंगमळा परिसरात आज (शुक्रवार) पहाटे दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरीशुभ्र चादर ठिकठिकाणी शेती व स्ट्रॉबेरी मळ्यामध्ये पाहावयास मिळाली. या परिसरात 4-5 डिग्रीपर्यंत पारा खाली उतरला होता. या निसर्गाच्या अविष्काराचा आनंद स्थानिकांसह पर्यटकांनी लुटला. हिवाळा हंगामात अशा प्रकारे हिमकण पाहावयास मिळत असतात. मात्र उन्हाळी हंगामाच्या सुरवातीलाच अशाप्रकारे हिमकण दिसणे हे येथील दुर्मिळ चित्रच म्हणावे लागेल. (छायाचित्र - अभिजीत खूरासणे)