परदेशी पक्षांचे आगमन

सोमवार, 4 डिसेंबर 2017

हिवाळा सुरु झाला की स्थल

हिवाळा सुरु झाला की स्थलांतरीत परदेशी पक्षाचे आगमन होते. कवडी पाट येथे लडाख, तिबेट, सैबेरिया या देशातून लाखोंच्या संख्येने पक्षी दाखल होतात. पक्षांचे भव्य संम्मेलन पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी वाढायला आता सुरुवात झाली आहे. 

हडपसर (पुणे) - दिवाळी झाली की रानावनातील हिरवे लुसलुशीत गवत हळूहळू पिवळे पडते. अंगाला झोंबणारा गार वारा गुलाबी थंडी घेऊन येतो. सृष्टी धुक्याची तरल चादर पांघरते आणि परदेशातील विविध प्रजातींच्यां पक्ष्यांच्या आगमनाची चाहूल लागते. सध्या हडपसर येथील कवडी पाट मुक्कामी अनेक परदेशी पक्षी दाखल झाले आहेत. या पाहूण्या पक्ष्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या अभ्यासासाठी पक्षीप्रेमी दुर्बीण, कॅमरा घेऊन मुळा- मुठा नदीच्या किनारी, पाणवठ्यांवर गर्दी करू लागले आहेत. 

यंदा आलेल्या परदेशी स्थलांतरीत पक्षामध्ये ब्लॅक विंग्ड स्टिल्ट(शेकाटया), चक्रवाक(ब्राह्मणी शेल्डक), चक्रांग(कॉमन टिल), थापट्या(नॉदर्न शॉव्हेलर), भिवई(गार्गनी), राखी धोबी(ग्रे वॅगटेल), तुतारी(वुड सॅंडपाइपर), दलदल ससाणा(यूरेशियन मार्श हॅरियर), भोरडी(रोजी पास्टर), तांबोला(रेड थ्रोटेड फ्लाय-कॅचर), नदीसूरय(रिव्हर टर्न) अशा अनेक पक्षांचा समावेश आहे. 

कवडी पाट येथे परदेशी स्थलांतरीत पक्षांबरोबरच स्थानिक स्थलांतरीत (भारतीय) पक्ष्यांमध्ये राखी बदक(स्पॉटबिल्डक), टिबुकली(डॅबचिक), पाणकावळा(लिटल कॉर्मोरेंट), काळा शराटी(ब्लॅक आयबिस), पांढरा शराटी(व्हाइट आयबिस), ताम्र शराटी(ग्लॉसी आयबिस), जांभळा बगळा(पर्पल हेरॉन) चित्रबलाक(पेंटेड स्टॉर्क), राखी बगळा(ग्रे हेरॉन), पाणथळ चरचरी(पॅडी फील्ड पिपिट), वंचक(पॉन्ड हेरॉन) मोठा बगळा(लार्ज इग्रेट), गाय बगळा(कॅटल इग्रेट), छोटा बगळा(लिटल इग्रेट), तुतवार(कॉमन सॅंड पायपर) चष्मेवाला प्लवर(लिटल रिंग्ड प्लवर), काजळ घार(ब्लॅक ईअर्ड काईट), जंगल मैना आदी पक्षी लाखोंच्या संख्येने दाखल झाले आहेत. 

Saam TV Live

ट्रेंडिंग