शहर आणि परिसरात मंगळवारीही (ता.5) ओखी चक्रीवादळाची दहशत होती. जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे अनेक नोकरदारांनी कार्यालयाला दांडी मारली; परंतु पावसाचा जोर फारसा नव्हता, तरीही काही ठिकाणी पाणी साचले.सकाळी पाऊस सुरू झाला, परंतु वादळाची तीव्रता कमी झाल्यामुळ

गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई- शहर आणि परिसरात मंगळवारीही (ता.5) ओखी चक्रीवादळाची दहशत होती. जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे अनेक नोकरदारांनी कार्यालयाला दांडी मारली; परंतु पावसाचा जोर फारसा नव्हता, तरीही काही ठिकाणी पाणी साचले.

सकाळी पाऊस सुरू झाला, परंतु वादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे मुंबई परिसरातील पावसाचा जोरही कमी झाला. दुपारी पावसाने काही काळ विश्रांती घेतली. सायंकाळनंतर पुन्हा तो सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत त्याची संततधार सुरू होती.

ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मंगळवारच्या मुंबईच्या पावसाने नवा रॅकोर्ड केला. मुंबईत 36 मि.मी. पावसाची नोंद झाली. 12 डिसेंबर 1967 रोजी मुंबईत 31.4 मि.मी. पाऊस झाला होता. डिसेंबरमध्ये पडलेला 50 वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस आहे

Saam TV Live

ट्रेंडिंग