यश पेपर्सची 60 कोटींची गुंतवणूक, भारतातल्या सर्वात मोठ्या कंपोस्टेबल टेबलवेअर प्लांटची निर्मिती करणार

yash papers

अन्न उद्योगात पर्यावरण-पूरक उत्पादनांच्या वापरला चालना देण्याकरिता कागद निर्मिती कंपनी यश पेपर्सने  विघटनशील, जैवअपघटनीय आणि पर्यावरण-स्नेही टेबलवेअर रेंज ‘चक’ची घोषणा केली. हे उत्पादन उसाच्या चिपाडापासून तयार करण्यात येईल. फैझाबाद, उत्तर प्रदेश येथील यश पेपर्स हा भारतातील सर्वात अत्याधुनिक कृषी अवशेष-आधारित कागदाचा ब्रँड असून ते मकडोनाल्ड्स, केएफसी आणि पिज्झा फूड चेनकरिता पॅकेजिंग मटेरियल पुरवतात. यश पेपर्सने या नव्या अपघटनीय प्रकल्प स्थापण्यासाठी रु. 60 कोटींची गुंतवणूक केली आहे. हा प्रकल्प अत्याधुनिक स्वरूपाचा असून इथे प्रोडक्शन इनोवेटीव सेंटरदेखील आहे. हा प्रकल्प सध्या फैझाबाद (युपी) मध्येअसून दरदिवशी 10 लाख युनिट निर्मिती क्षमतेने युक्त असेल.

भारतात नियमित स्वरुपात 15,000 टनाहून अधिक प्लास्टिक तयार होते. पॅकेजिंग क्षेत्रात प्लास्टिक वापर मोठ्या प्रमाणावर होतो. या क्षेत्राला 35% प्लास्टिकची गरज भासते. अन्न उद्योगाची प्लास्टिकवर असणारी मदार कमी करण्याच्या उद्देशाने यश पेपर्सने मॉड्यूलर कॉस्ट इफेक्टिव डिझाईन प्राईज रु. 1 ते रु. 7 दरम्यान ठेवली आहे. जी प्लास्टिकच्या तुलनेत स्वस्त आहे..

पर्यावरण-स्नेही उत्पादन श्रेणीच्या लॉन्चप्रसंगी बोलताना यश पेपर्सचे हेड ऑफ स्ट्रॅटेजी श्री. वेद कृष्णा म्हणाले की, आपण थर्मोकोल आणि प्लास्टिक उत्पादनांसारख्या अविघटनशील वस्तूंचा सर्रास वापर करत असतो. याबाबत कोणतीही जनजागृती होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यावरणाला हानी होते. ही वेळ अशा उत्पादनांची आहे, जी आपल्याला सुरक्षित अन्न सेवनास सक्षम करेल आणि या ग्रहाला विघटनशील घटकांचे वरदान लाभेल.” भारतात पॅकेजिंगचे चांगले टिकवू पर्याय आणण्यासाठी व्यवस्थित प्रक्रिया लागू करण्याची गरज पाहून कंपनीने मागील महिन्यात फूडपांडा या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसोबत रणात्मक भागीदारी केली. या उपक्रमामुळे फूडपांडाचा 15000+ रेस्टॉरंट पार्टनर बेस आपल्या ग्राहकांना पर्यावरण-पूरक पॅकेजिंग उपलब्ध करून देणार आहे.

image_print
Total Views : 631

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड