लष्करे तैयबाचा कमांडर अबू दुजाना चकमकीत ठार

Jammu & kashmir,LeT chief AbuDujana,killed, encounter,pulwama

जम्मू – जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्करे तैयबा दहशतवादी संघटनेचा कमांडर अबू दुजानासह दोन दहशतवादी ठार झाले.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील हकरीपोरा येथे आज (मंगळवार) पहाटे लष्करे तैयबाचे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली. हकरीपोरा येथील एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि काश्मीर पोलिस दलातील जवानांनी संयुक्तरित्या मिळून कारवाई केली. परिसरात शोधमोहिम सुरु असताना दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अबू दुजानासह अन्य दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

अबू दुजाना हा लष्करे तैयबाचा कमांडर म्हणून काम करत होता. त्याच्यावर लष्कराकडून 10 लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते. त्याच्यासाठी अनेकवेळा ऑपरेशन राबविण्यात आले होते. अखेर त्याला ठार मारण्यात यश आले आहे.

 

image_print
Total Views : 475

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड