कुलभूषण जाधव यांच्या अडचणीत भर, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी फेटाळली दया याचिका

Kulbhushan Jadhav, Pakistan ,Pakistan Army Chief, Qamar Javed Bajwa,Mercy plea

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची दया याचिका पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फेटाळलीय.आता सर्वांचं लक्ष पाकचे लष्कर प्रमुख जावेद बाजवा यांच्याकडे लागलंय. बाजवा हे  कुलभूषण यांच्याविरोधातल्या कथित पुराव्यांची तपासणी करुन त्यांच्या याचिकेवर निर्णय घेतील. कुलभूषण जाधव यांच्या सर्व दया याचिकांवर सुनावणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत त्यांना फाशी दिली जाणार नाही, असं पाकिस्ताननं 1 जूनला स्पष्ट केलं होतं.कुलभूषण जाधव पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करु शकतात.कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जावेद बाजवा यांच्याकडे अगोदरच दया याचिका दाखल केलीय.आता यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडे दया याचिक दाखल करण्याचा पर्याय कुलभूषण जाधव यांच्याकडे आहे.

image_print
Total Views : 158

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड