दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नीचे निधन

दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नीचे निधन

मुंबई- दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नी आणि अभिनेता अक्षय खन्ना यांच्या आई गीताजंली खन्ना यांचे निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  अलिबाग येथील मांडवा येथे त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज (ता.16) रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी अभिनेता अक्षय खन्ना व राहुल खन्ना हे दोन्ही मुले उपस्थित होते. गीतांजली यांच्या पार्थिवावर मांडवा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी विनोद खन्ना यांचे निधन झाले होते. आणि आता गीताजंली यांचे निधन झाले आहे. अक्षय खन्ना व राहुल खन्नावरून आई आणि वडील असं दोघांचही छत्र हरपलं आहे.

दरम्यान, सन 1971 मध्ये विनोद खन्ना यांनी गीतांजलीसोबत लग्न केले होते. पण अचानक विनोद खन्ना आपले फिल्मी करिअर, कुटुंब सगळे काही मागे सोडून ओशोच्या सेवेत लागले. ओशोच्या सेवेत ते असे काही गुंतले की, त्यांनी कुटुंबापासून फारकत घेतली. सगळे काही सोडून विनोद यांनी अमेरिकेत ओशो कम्युन रजनीशपूरममध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गीतांजली यांच्यासाठी हा निर्णय धक्कादायक होता. विनोद यांच्या या निर्णयाने गीतांजली यांनी अक्षय व राहुल या दोन मुलांना घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी विनोद यांना घटस्फोट दिला.

या घटस्फोटानंतर पाच वर्षांनी विनोद खन्ना मुंबईला परतले आणि त्यांनी नव्याने आयुष्य सुरू केले. 1990 मध्ये त्यांनी कवितासोबत दुसरे लग्न केले. कवितापासून विनोद खन्ना यांना साक्षी व श्रद्धा ही अशी दोन मुले झाली. अर्थात पहिल्या पत्नीपासून घटस्फोट होऊनही विनोद यांनी पित्याचे कर्तव्य निभावले. अक्षय खन्नाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी त्यांनी हिमालय पुत्र हा चित्रपट बनवला. राहुलचे करिअरही त्यांनी मार्गी लावले. २७ एप्रिल २०१७ रोजी विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पहिल्या पत्नी गीतांजली यांनीही जगाचा निरोप घेतला.

Web Title: Late Vinod Khannas Ex-Wife Geetanjali Khanna Passes Away

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com