दारू दुकान मालकाचा ह्दयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू

दारू दुकान मालक ,  ह्दयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू,  सुप्रीम कोर्ट, सांगली, Liquor ban On Highway , 

सुप्रीम कोर्टानं राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील 500 मीटरच्या आतील दारूची दुकानं बंद करण्याचं निर्णय दिल्यानंतर सांगलीत पहिला बळी गेलाय. या निर्णयाचा धसका घेऊन सांगली जिल्ह्यातील विटा शहरातील शिवाजी मेटकरी या दारू दुकान मालकाचा ह्दयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालाय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं 500 मिटर अंतरावरील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दुकानं बंद झाली आहेत. राज्यातील हजारो दुकान मालकांना तसंच कामगारांना याचा फटका बसलाय. याचाच प्रत्यय आज सांगलीत पाहायला मिळाला. विटा शहरातील दारू दुकान मालक शिवाजी मेटकरी यांचा या आदेशाच्या धक्क्यानं मृत्यू झालाय. दारूदुकान बंदीनंतर हा राज्यातला पहिलाच बळी आहे. त्यांच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होतीय.

image_print
Total Views : 493

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड