पश्‍चिम महाराष्ट्रात 235 कोटींची थकबाकी

Solapur, Western Maharashtra, Electricity,MSEB,

सोलापूर – पश्‍चिम महाराष्ट्र महावितरणची घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकी 235 कोटी रुपयांची आहे. त्यामुळे त्या थकबाकीविरोधात वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर थकबाकीदारांनी वीजबिलांची थकबाकी त्वरित भरून सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 16 लाख 82 हजार वीजग्राहकांकडे सद्यःस्थितीत 235 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात पुणे जिल्ह्यात सात लाख 80 हजार वीजग्राहकांकडे 151 कोटी 17 लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख 28 हजार वीजग्राहकांकडे 18 कोटी 87 लाख, सांगली जिल्ह्यातील एक लाख 98 हजार ग्राहकांकडे 19 कोटी 59 लाख, सातारा जिल्ह्यात दोन लाख 12 हजार ग्राहकांकडे 17 कोटी 57 लाख तर सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख 63 हजार ग्राहकांकडे 27 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी आहे. पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबतच्या उपाययोजना तसेच वीजबिलांची थकबाकी वसूल करण्यासंदर्भात प्रादेशिक संचालक ताकसांडे यांनी सूचना केल्या.

image_print
Total Views : 188

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड