लोकसभेने मध्यरात्रीपर्यंत कामकाज करून साजरी केली आगळी आषाढी

लोकसभेने मध्यरात्रीपर्यंत कामकाज करून साजरी केली आगळी आषाढी

नवी दिल्ली : कामकाज सुरू झाले रे झाले की गोंधळामुळे बंद पडणारी सभा अशी प्रतिमा तयार झालेल्या लोकसभेने काल (ता. 11) मध्यरात्रीपर्यंत कामकाज चालवून जणू आगळी आषाढी एकादशीच साजरी केली.

संसदेचे कामकाज रात्रीपर्यंत चालणे आणि सलग तेरा तास जेवणाचीही सुट्टी न घेता चर्चा होणे हा गेल्या अठरा वर्षातला विक्रम असल्याचे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नमूद केले यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले. या चर्चेत विरोधकांनी सरकारवर रेल्वेच्या खाजगी करण्याचा सपाटा लावल्याचा आरोप केला तर सत्तारूढ खासदारांनी रेल्वेचे अपघात गेल्या पाच वर्षात राहत तर टक्क्यांनी घटल्याचा दावा केला. या चर्चेत शंभर खासदारांना संधी मिळाली त्यातही नवख्या खासदारांना जास्त संधी देण्याचे धोरण बिर्ला यांनी ठेवले.

कामकाज संपल्यावर खासदारांपैकी काहींनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार काँग्रेस आणि सत्तारूढ भाजप यामधील फरक काय तर चर्चा संपताना मध्यरात्री काँग्रेसचे गौरव  गोगोई बोलत होते तेव्हा त्यांच्या मागचे सारे बाक रिकामे होते. दुसरीकडे जळगावचे उमेश पाटील अजंठा रेल्वेच्या नकाशावर आणण्याची मागणी करत होते तेव्हा स्वतः पियुष गोयल त्यांचे म्हणणे वहीत नोंदवून घेत होते. 

Web Title: Loksabha working continues till midnight on 11th July

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com