(Video) - एवढी तुफान हाणामारी कशासाठी झालेय तर फक्त पावासाठी
भिवंडी शहरातील कामतघर येथील हनुमान नगर परिसरात मौर्या किराणा दुकानामध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून दुकानदारासह कुटूंबाला मारहाण करत दुकानाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.
शहरातील कामतघर येथील हनुमान नगर परिसरात मौऱ्या किराणा दुकानात सकाळच्या सुमारास एका ग्राहकानं दहा रुपयाचे पाव मागितले. दुकानदारानं ग्राहकाला दहा रुपयाचे पाच पाव दिले, मात्र ग्राहकानं दहा रुपयांमध्ये सहा पावची मागणी केली.
त्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये किरकोळ बाचाबाची होऊन शिवीगाळ झाली. काही वेळानंतर त्या ग्राहकानं आपल्यासोबत कुटुंबियांसोबत तिथं येऊन दुकानदाराला मारहाण केली.