शिवसेनेलाच प्लास्टिकबंदीचा विसर पडला? प्लास्टिकनं गुंडाळेले बुके देत स्वागत

शिवसेनेलाच प्लास्टिकबंदीचा विसर पडला? प्लास्टिकनं गुंडाळेले बुके देत स्वागत

राज्यात सर्वत्र प्लास्टिक बंदी झालीये मात्र अजूनही अनेकांना याचे भान नसल्याचे समोर येत आहे. सवयी प्रमाणे मान्यवरांचे स्वागत करताना प्लास्टिकने गुंडाळलेले बुके देऊन सर्रास सर्वत्र स्वागत केलं जातंय.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही असाच प्रकार केलाय. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत काही मान्यवर आणि निवडणुकीत पाठिंबा जाहीर करणाऱ्यांचे स्वागत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

मात्र, प्लास्टिक बंदी झाल्याचा विसर चक्क शिवसेना नेत्यांनाच पडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी यावर बोलणं टाळलं आणि आपली चूक लक्षात आल्यावर पुढील सत्कारसाठी बुकेवरील प्लास्टिक काढायला लावले. यानंतर शिवसेनेचे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संजय मोरे यांनी लगेच बुकेवरील प्लास्टिक काढले आणि प्लास्टिक विरहीत बुके देऊन सत्कार केला गेला.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com