दक्षिण मुंबईतील अधिकृत निकालांसाठी लागणार 15 तास

दक्षिण मुंबईतील अधिकृत निकालांसाठी लागणार 15 तास

मुंबई : दक्षिण मुंबईतील दोनही मतदार संघांच्या मतमोजणीला पोस्टल बॅलेट व सर्वीस बॅलेटच्या सहाय्याने सुरूवात झाली आहे. दक्षिण मुंबईत 22 व दक्षिण मध्य मुंबईत 21 ईव्हीएम मतमोजणीच्या फे-या होणार आहेत. त्यासाठी एकूण 15 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. प्रत्येक मतमोजणी काउंटरवर 84 कर्मचारी, एक निरीक्षक व एक मायक्रो ऑब्जर्वर उपस्थीत राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, कोळीवाडा, वडाळा, माहिम व  दक्षिण वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा असे एकुण बारा विधानसभा मतदारसंघ येतात. यात अनुक्रमे  दक्षिण मध्य मध्ये पुरुष ४ लाख ३२ हजार २६०, महिला -३ लाख ६३ हजार १०७ व इतर ३२ असे एकुण ७ लाख ९५ हजार ३९९ म्हणजेच ५५.२३% मतदान झाले. तर  दक्षिण मध्ये पुरुष-४ लाख ३८ हजार ५९१, महिला -३ लाख ६१ हजार ०१६ व इतर ०५ असे एकुण  सात लाख ९९ हजार ६१२ एकुण ५१.४५ % मतदान झाले.  दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात एकुण मतदार संख्या पुरुष ७ लाख ७७ हजार ७१६, महिला ६ लाख ६२ हजार ३३५ व इतर ९१ एकुण १४ लाख ४० हजार ११० आहे.

दक्षिण मध्य मतदार लोकसभा मतदारसंघात ईटीपीबीएसचे एकुण २३८ मतदार व पोस्टल बॅलेटचे एकुण ३५३७ असे एकुण ३७७५ मतदार आहेत. तसेच ३१-मुंबई दक्षिण मतदार लोकसभा मतदारसंघात ईटीपीबीएसचे एकुण २५१ मतदार व पोस्टल बॅलेटचे एकुण ३हजार १३३ असे एकुण ३ हजार ३८४ मतदार आहेत. या सर्व मतांची मोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील पाच मशीनमधील बॅलेट पत्रांची मोजणी होणार आहे. प्रत्येक फेरीसाठी किमान अर्धा तासांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्यामुळे  अंतिम निकालासाठी सुमारे पंधरा तासांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com