मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानात अटक

मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानात अटक

मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला लाहोर : मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानमध्ये आज (बुधवार) अटक करण्यात आली. दहशतवादविरोधातील भारताच्या दबावाला मोठे यश मिळाले आहे.

हाफिज सईद याच्यासह जमात उद दावा या दहशतवादी संघटनेच्या 13 जणांना लवकरच अटक करू, असे पाकिस्तानमधील पोलिसांनी सांगितले होते. या सर्वांविरोधात बुधवारी (ता. 3) गुन्हा नोंदविण्यात आला होता. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने हाफिज सईदसह 13 जणांविरोधात 23 एफआयआरची नोंद केली होती. या सर्वांवर दहशतवादाला आर्थिक पाठबळ पुरविल्याचा आरोप आहे. या 13 जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद झाली असल्याने त्यांना लवकरच अटक करू, असे पंजाब प्रांताच्या पोलिसांनी सांगितले होते. हाफिज सईदला आज बेड्या ठोकण्यात आल्यामुळे दहशतवादविरोधातील कारवाईला सुरवात झाली असून, भारताचे मोठे यश समजले जात आहे.

दरम्यान, पाकिस्तान सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असल्यानेच दहशतवाद्यांविरोधात कारवाईला वेग आल्याचे मानले जाते. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बोलताना पाकिस्तानमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक पुरवठ्यावर करडी नजर ठेवणाऱ्या फायनान्शिअल ऍक्‍शन टास्क फोर्स (एफएटीएफ) या संस्थेने पाकिस्तानचे नाव त्यांच्या "ग्रे लिस्ट'मध्ये कायम ठेवले आहे. दहशतवाद्यांना होणारा निधीपुरवठा रोखण्यात आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात पाकिस्तानला अपयश आल्यानेच ग्रे लिस्टमध्ये त्यांचे नाव कायम राहिले. या यादीत नाव असल्याने पाकिस्तानला आर्थिक मदत मिळण्यात अडचणी येत आहेत. सप्टेंबरअखेरपर्यंत पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांवर ठोस आणि पुराव्यासह कारवाई न केल्यास काळ्या यादीत नाव टाकण्याचा इशारा "एफएटीएफ'ने दिला आहे. म्हणूनच, पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार दहशतवाद्यांविरोधात कारवाई करीत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: 26/11 mastermind Hafiz Saeed arrested from Lahore

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com