अनिल अंबानी यांनी 'नॅशनल हेरल्ड' विरोधातील बदनामीचा खटला घेतला मागे 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 मे 2019

अहमदाबाद : अनिल अंबानी यांच्या "रिलायन्स' उद्योग समूहाने काँग्रेस नेते आणि पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "नॅशनल हेरल्ड'विरोधातील पाच हजार कोटी रुपयांचा दिवाणी स्वरूपाचा बदनामीचा खटला मागे घेतला आहे.

बहुचर्चित राफेल व्यवहाराबाबत कॉंग्रेस नेत्यांनी वाद्‌ग्रस्त वक्तव्ये केली होती, तसेच पक्षाच्या मुखपत्रातूनदेखील यावर टीकात्मक लिखाण झाल्याने अंबानी यांनी येथील न्यायालयामध्ये हा खटला भरला होता.

या खटल्याची येथील दिवाणी आणि सत्र न्यायाधीश पी. जे. तमाकुवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती. आम्ही हा खटला मागे घेत आहोत, याची माहिती संबंधित पक्षकारांना कळविली असल्याचे अंबानी यांचे वकील रईस पारिख यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर हा खटला मागे घेतला जाण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

या नेत्यांचा समावेश 
रिलायन्स उद्योग समूहाने काँग्रेस नेते सुनील जाखड, रणदीपसिंह सुरजेवाला, ओमन चंडी, अशोक चव्हाण, अभिषेक मनू सिंघवी, संजय निरूपम आणि शक्तिसिंह गोहील यांच्यासह काँग्रेसचे मुखपत्र असणाऱ्या "नॅशनल हेरल्ड'मधील काही पत्रकारांविरोधात खटला भरला होता. " हेरल्ड'चे संपादक जाफर आगा आणि या संदर्भात लेख लिहिणारे विश्‍व दीपक यांचाही यात समावेश होता.

Web Title: Anil Ambani to withdraw ₹5000 crore worth defamation suits against Congress leaders National Herald

संबंधित बातम्या

Saam TV Live